एक जबरदस्त वेगवान पोलिटिकल थ्रिलर- इब्लिस 'इब्लिस' मास्क चेहऱ्यावर धारण करून अन्यायाचं राज्य संपवायला तो निघाला

होता. म्हणून अंडरवर्ल्डमध्ये त्याचं नांव 'इब्लिस' पडलं होतं.

इब्लिस!!!
पिवळट पांढरे दात विचकारा, काळी आऊटलाईन असलेला, डोक्यावर दोन अनुकुचीदार रक्तवर्णी शिंगे असणारा, नाकापासून हनुवटीपर्यंत तोंड झाकोळून टाकणारा 'डीमन' मास्क तो सतत परिधान करून असायचा; असतो... त्याच्या या मास्क वरून त्याला सर्वमान्य प्रचलित नांव 'इब्लिस' असंच पडलं होतं. हे नांव उच्चारणही बरेचजण टाळत असतं. हिंमत असणारेच त्याला या नांवाने उद्धृत करत असत. त्याच्या प्रिय 'कोल्ट कमांडर्' या पिस्टलने तो दुष्ट निखदनाचे काम करी म्हणून त्याला त्याची सोबतीण हेली, ही कमांडर् देखील म्हणत असे. परंतु 'कमांडर्' पेक्षा 'इब्लिस' हेच नांव त्याला अधिक प्रिय!
या इब्लिसचा अर्थ प्रचलित मराठीतील 'उपद्व्यापी' असा नाही. अरबी भाषेनुरूप 'तो, जो हमेशा दुःखात असतो' असा 'इब्लिस!' यालाही दुःख कुठे चुकलं होतं?! दुःख जणू याची सावली होतं. अरबीत आणखी एक अर्थ आहे; तो म्हणजे 'सैतानांचा नेता!' पारसी/तुर्की/ग्रीक भाषा संस्कृतींमध्येही याचा अर्थ 'सैतान' असाच दिलाय. तो स्वतःला तसाच पाहत होता. सैतानासारखा!
'इब्लिस' हा, कुणासाठी 'कमांडर्' होता, कुणासाठी इब्लिस होता, कुणासाठी तो 'विरुढक' होता, तर कोण त्याला 'हेडीस' म्हणून गेलं होतं... परंतु... परंतु ही कथा 'इब्लिस'ची नाहीच. तर ही कथा आहे 'इब्लिस'चा आमूलाग्र बदल होऊन पुन्हा 'रवी' होण्याची! इब्लिसचा हिंसेकडून अहिंसेकडे येण्याचा प्रवास म्हणजे ही कथा...