" खरच गावकर्‍यानोs , तुमच्या पूर्वजांची थोर पुण्याई म्हणून शिवाजीचा हा पराक्रमी बाळ चिरनिद्रा घेण्यासाठी तुमच्या

गावमातीच्या मांडीवर आला! ती बघा पल्याडची इंद्रायणी! काही सालामाग समाजकंटकांनी तुकोबा माऊलिंची अभंगगाथा तिच्या डोहात बुडवली होती. इंद्रायणी मातेन ती पाण्याबाहेर आणून दिली म्हणतात तशीच काळाच्या डोहात भिजलेली आमच्या पराक्रमी शिवपुत्राची ही गाथा वर यायला किती वर्ष लागतील कुणास ठावुक! पण आज उद्या परवा तेरवा ,,काही शतकांच्या प्रवासा नंतर का होईना ती वर येईलच! कारण सत्य एवढी शाश्वत गोष्ट दुनियेत अन्य नाही! पण जेव्हा केव्हा गैर समजाचे बदनामीचे तकलादू पडदे फाडून ही खरि खुरी हकीकत समाज मनाला कळेल ,तेव्हा मात्र शेजारच्या देहु अणि आळंदीसारख्या इथे वढू गावातही,यात्रा भरतील ! आपल्या देशासाठी ,धर्मासाठी अणि मातीच्या अभिमानासाठी मृत्युला मीठी मारणार्‍या ह्या मर्दाच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी ह्या शक्तिस्थळा कड़े दुनिया धावेल !!

 --- संभाजी (विश्वास पाटिल )