तुझ्या कुंकवाला
आधार गं मेणाचा
पणतीत नाही ज्योत
प्रकाश काजव्यांचा

दीठावलेल्या पापण्यांना
आसवांचा गं पूर

काळाच्या ओघावर
पाण्याच्याच रेषा
हृदयी प्रहार आहे
शब्दावीनाच भाषा.

--- अशोक लंगडे