चांगभलं!! MHJ फेम शिवाली परबची. ‘उलगुलान’मध्ये वर्णी; Insta’वर शेअर केलं सिनेमाचं पोस्टर.

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर आणि हरहुन्नरी कलाकार मराठी मनोरंजन विश्वाला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. विविध कॉमिक पात्र साकारत शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.

 विनोदाचं अचूक टायमिंग साधणारी शिवाली तिच्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि आता तर मराठी चित्रपटांतही तिची वर्णी लागते आहे. नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री शिवाली परब आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच शिवालीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या आगामी नव्या मराठी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘उलगुलान’ असे आहे. ‘झाडीपट्टी’ या चित्रपटानंतर तृशांत इंगळे ‘उलगुलान’ हा नवा चित्रपट आणि नवा विषय हाताळण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत इंगळेने केले असून हा चित्रपट येत्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

शिवालीने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘ ”U L G U L A N” (The true story of a real fake) “उलगुलान”च्या नावानं चांगभलं. २०२४ ला थिएटरमध्ये .. नवा प्रोजेक्ट’. शिवलीच्या या पोस्टवर तिचे चाहते, नेटकरी तसेच मनोरंजन विश्वात कार्यरत असलेले कलाकार कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. याआधी शिवालीने ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या मुख्य भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. तर या चित्रपटातील तिच्या किसिंग सीनने सोशल मीडिया गाजवला होता.