LOGIN
Sign In or Register
Avatar
Not Registered Yet?

Join Now! It's FREE. Get full access and benefit from this site

Reset My password - Remind Me My username

Username
Password
Remember me

कलाकार

मराठी अभिनेता, अभिनेत्री, संगीत, कला आणि अन्य क्षेत्रातील मंडळींची जीवन मालिका
आकाश ठोसर

आकाश ठोसर

  • जन्म तिथी: 24 February 1993

चित्रपटामुळे एका रात्रीत 'स्टार' झालेला परशा उर्फ आकाश ठोसर हा पुण्याच्या औंध येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील गवंडीकाम करतात. तो नागराज मंजुळेंच्या गावी कुस्ती खेळण्यासाठी गेला आणि थेट हिरोच झाला. आकाश हा अतिशय सामान्य कुटुंबात वाढला आहे. २४ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेल्या आकाशने आपले शिक्षण पुण्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज, औंध येथून पूर्ण केले आहे. आता तो पुणे विद्यापीठात बाहेरुन एम. ए. करीत आहे.

आकाशला कुस्तीची आवड आहे. सैराट चित्रपटासाठी हिरोचा शोध सुरु असताना तो नागराज मंजुळेंच्या गावी कुस्ती खेळण्यासाठी आला होता. तेव्हा नागराजच्या भावाने त्याला रेल्वे स्टेशनवर पाहिले आणि त्याचा फोटो नागराजला पाठवला. पाहता क्षणीच आकाश त्यांना आवडला आणि त्याचे भवितव्यच बदलून गेले.

व्यायामाची आवड असलेल्या आकाशला पोहण्याचीही आवड आहे. सैराट चित्रपटातील परशा साकारण्यासाठी त्याला १३ किलो वजन कमी करावे लागले होते. अभिनयाची त्याला आवड होती. त्याने कॉलेजमध्ये असताना काही नाटकांत भाग घेतला होता. नागराज मंजुळेंच्या सोबत राहून त्याने भूमिकेतील अनेक बारकावे समजून घेतले. त्याच्यासाठी नागराज म्हणजे अभिनयाचे चालते फिरते विद्यापीठच ठरले.

संबंधित कलाप

सैराट

आपला अभिप्राय द्या

आपण अतिथी म्हणुन अभिप्राय देत आहात.

फेसबुक

चित्रफिती विश्व

चित्रपट प्रस्तुती तिथी